तुला का हवी साथ कुणाची...???
आज सहज सर्व कामातून थोडा वेळ माझ्यासाठी काढून मी घरा शेजरच्या बागेत फिरायला गेले.त्या थंडगार, शांत वातावरणात फार प्रसन्न वाटत होत.वाटल बर झाल की आज थोडा वेळ सवतःला मिळाला.मी तिथे फार रमून गेले
आणि फिरून झाल्यावर असेच बागेतील बाकड्यावर बसले होते.पाहिलं तर तिथे एक मुलगा एका मुलीला गुलाब देऊन म्हणत होता "Happy Rose Day 🌹🌹🌹"
अन् ते शब्द ऐकून मी माझ्या मनाशी पुटपुटले " आज Rose Day आहे वाटत".त्यांना पाहून वाटल अरे खरचं आयुष्य एवढं सुंदर बनत का कोणी साथ दिली तर...???
आणि मनाने उत्तर दिलं की हो बनत ही असेल.कारण प्रत्येकाला कोणाची ना कोणाची गरज असतेच की. जस झाडाला गरज असते पाण्याची,श्वास घ्यायला गरज असते oxygen ची,कवीला गरज असते शब्दांची , चित्रकाराला गरज असते रंगांची,ज्योतीला गरज असते समईची, तसचं माणसाला गरज असते माणसाची.पण मग त्या व्यक्तीचं काय जी एकटीच आहे. स्वतः चे सुख,दुःख,आनंद ती व्यक्ती कोणासोबत share करणार...???
मग घरी येऊन असच लिहीत असताना पुन्हा तो प्रसंग आठवला अन् मनाला प्रश्न विचारावा वाटला, की खरचं आयुष्याला का हवी साथ कुणाची...???
मग पूर्ण मन गुंग झाले अन् हा एक विचार मनात घोळू लागला.एक एक शब्द ,एक एक ओळ लिहू लागले.अन् नकळत मनाने एवढे लिहिले की न रहवता मी सर्व काही टाईप करू लागली.आणि जे मला वाटल ते सहज monitor च्या screen वर डोळ्यांना दिसू लागलं. मग एक प्रश्न मी स्वतः ला केला आणि उत्तर ही त्याच मीच दिलं...
खरचं आहे का मला गरज या आयुष्यात कुणाची..??
कोणी सोबत असण्याची,
कोणी माझे हट्ट पुरवण्याची..??
कोणी पावलो पावली सोबत चालण्याची...???
कोणी मला धीर देण्याची...???
तर माझं उत्तर आहे नाही.अजिबात नाही.हो हो बरोबर ऐकल तुम्ही अजिबात नाही.उत्तर ऐकून आश्चर्य वाटल का..?? पण ह्या उत्तराला कारण ही समर्पक आहेच.म्हणून माझ उत्तर तरी नाहीच आहे..
हा माहितीय मला
खूप सारे problems, खूप सारे संकट आहे माझ्या आयुष्यात , पण त्या संकटांना तोंड देणं मला जमतच ना
हो आहेत माझ्या आयुष्यात खूप सारे दुःख ,खूप सारे sadness पण सुख म्हणजे नक्की काय असत,हे त्या दुःखातून च मी शिकते ना
हो रडते मी कधी कधी आणि फक्त रडत नाही तर खूप खूप रडते पण रडता रडता स्वतः ला मीच सावरते ना
खूप साऱ्या चुकाही होतात माझ्याकडून पण त्या चुका वेळेवर ही मीच सुधारते ना
हा असतील माझ्यावर अनेक बंधने,अनेक restrictions असतील पण जी बंधने योग्य आहे तेव्हढीच मी पाळते ना अन् जी बंधने योग्य नाही त्यांना ही मीच मोडते ना
हो घाबरते सुद्धा मी या आयुष्यात येणाऱ्या अनेक लोकांना
पण कोणाला ही न कळता त्यांच्याशी ही लढतेच ना
हो नसतील होत माझे काही स्वप्न पूर्ण,राहत असतील माझे dreams अपूर्ण पण त्या स्वप्नांना अस्तित्वात मी साकारते च ना
हा दिसत मला इथे प्रत्येक गोष्ट की कोण काय करतंय,कोण कसं वागतोय पण माझ्या जागेवर मी 100 टक्के योग्य आहे ,हे पण मला समजतच ना
हा वेळ आली की काही प्रसंग फार त्रास ही देतात मला ,tension ,depression सर्वच घेऊन येतात मला पण त्यात खंबीर वागणे मला तरी येतेच ना
हो नसेल कळत मला कोणता रस्ता बरोबर आहे पण वाट माझी चुकली तर मी नवीन रस्ता निर्माण करते
हो आहेत अपेक्षा भरपूर माझ्या ,पण दुसऱ्याकडून मी अपेक्षा कुठे करते ,आहे ते फक्त स्वतः मनाने पूर्ण करते
हो पडत असेल मी दहावेळा पण जिद्दीने पुन्हा उभी ही होते
मदत कुणाची न घेता
हो नसेल मी perfect इथे,असेल मी खूप simple, नसेल कळत मला जगाच्या गोष्टी पण कोणीच perfect नाही इथे हे पण मी जाणते च ना
सगळे म्हणत ही असतील ही म्हणजे impossible पण ते I am possible म्हणून मीच बदल घडवते ना
होतात कधी कधी वाईट गोष्टी माझ्या सोबत पण वाईट अनुभव आठवणीत घेऊन मी आयुष्य सुंदर करतेच ना
मग एवढा धीर मी स्वतः ला देते,
एवढी मला मी ओळखते,
इतके प्रेम स्वतः वर करते,
मग का हवी मला साथ कुणाची
जर हवं ते सर्व मी माझ्यासाठी करते
प्रसंगी आनंदी असते
नेहमी मनाला साथ देते
मग का हवी मला साथ कुणाची
दुःखातून सुख मिळवते
वाईट गोष्टी बाजूला सारते
अन् रडता रडता हसणे शिकते
मग का हवी मला साथ कुणाची
का हवी मला साथ कुणाची
जर एवढं मी स्वतः ला जाणते
तर मग नको मला गुलाब कोणाकडून जर आयुष्यात माझ्या मी सुगंध पसरवते
नको मला चॉकलेट कोणाकडून जर मीच माझ्या आयुष्यात गोडवा निर्माण करते
नको मला एकही teddy जर teddy एवढं सुंदर विश्व माझे मी तयार करते
नको मला promise कोणाचं आयुष्यभर मला साथ देण्याचे जर मीच माझा धीर होते
नको मला एक मिठी कोणाची जर मी रडताना मीच माझा खांदा बनते
अन् नको मला व्हॅलेंटाईन आयुष्यात जर मीच स्वतः ची व्हॅलेंटाईन बनते
हे जग आहे ना,जो घाबरतो त्याला अजून घाबरवत.जो रडतो त्याला अजून रडवते,जो दुःखी असतो त्याला अजून दुःखी करतो मग त्यापेक्षा आपणच मनाला आपल्या ओळखून स्वतः ला धीर दया.
आजचा हा लेख प्रत्येक त्या मुलीसाठी जी म्हणते की या जगात मी एकटी आहे. माझे असे कुणीच नाही.खरतर या जगात कुणीच एकट नसत.कारण प्रत्येकाला मन असत जे आपल्या भावना समजून घेत.प्रसंगी सावरत.थोडंसं घाबरत पण खूप धीट ही असत.कधी कधी खूप रडत पण हळुवार आपल्याला हसवत.म्हणून कधीच स्वतः ला एकट नका मानू.तुमच्या मनाच्या आधाराने पुढे जात रहा.ते कधीच तुम्हाला सोडणार नाही.काही वाईट होऊन देणार नाही.नेहमी तुम्हालाच साथ देणार.तुमच्या स्वप्नांना,इच्छांना बळ देणार.तुम्हाला यशाच्या शिखरा वर पोहण्यास मदत करणार.
म्हणून स्वतः वर प्रेम करा💖💖स्वतः स्वतःचे व्हॅलेंटाईन बना✌️✌️तुम्हाला हवं ते करा🤩🤩आणि स्वतः ला आनंदी ठेवा💖💖
म्हणून माझ तर प्रेम आहे स्वतः वर.
आणि तुमचं कोणावर स्वतः वर की तुम्हाला हवी साथ कुणाची ?????....नक्की कळवा.....👍
No words in front of you👏👏👏👏
ReplyDeleteThank you so much that you like my content 😊
DeleteJust stay tune with me for more contents
Nice dearQ 👌👌
DeleteThank you so much😊
DeleteJust be with me for new contents👍
Thanks for your comment.Just stay up to date with me for new one👍
ReplyDeleteखूप सुंदर लेख आहे.👍👍
ReplyDeleteThanks for your comment and stay up to date with me for new one 😍👍
DeleteBeautiful ❤️
ReplyDeleteThank you 😊
Delete