Tuesday, February 16, 2021

शेवटी युद्ध आपणच जिंकतो...👍

शेवटी युद्ध आपणच जिंकतो....👍


खुप काही स्वप्न असता , खुप काही ईच्छा असता

पण त्यांना अटी सुद्धा एवढ्या असता , की स्वप्न काय अन् ईच्छा काय..

सर्व तिथेच लोप पावता


मग हातात उरत काहीच नसत , मनाला काही सुचत नसत

डोळ्यात खूप साठून जात , अन् पुन्हा मग ते वाहू लागत


वाहता वाहता पुर येतो , सर्व जणू उध्वस्त करतो

ओरडून ओरडून आपण थकतो , पण आवाज कोणी ऐकत नसतो


पण तिथेच कोणी मरत नसत , थोड लढण बाकी असत

कारण जे अस्तित्व असत, ते हारण तरी शिकवत नसत


मग वेळ अस्तित्व जपायला सांगते , तिमिरात एक कंदील मिळते

थोड अंधुक पण स्पष्ट दिसत , अन् मन पुन्हा घट्ट होत


मग अचानक खूप हिम्मत येते , मनात खूप जिद्द पेटते

अवघड वळण सोपे दिसते , आपलेच स्वतःहून कुतूहल वाटते


क्षण क्षण आपण लढतो , इच्छांना नवा उजाळा देतो

स्वप्नांना आपल्या विसावा मिळतो ,अन् सर्वच काही साकार करतो


मग काहीही झाले जीवनामध्ये ,आपण आता रडत नसतो

घडतंय त्त्याच्याशी युद्ध करतो,अन् शेवटी युद्ध आपणच जिंकतो....

शेवटी युद्ध आपणच जिंकतो....👍


(

👆👆ही माझी कविता जी मला कधीच मला हरवत नाही.तर नेहमीच नवीन स्वप्न दाखवते,त्यांना पूर्ण करण्यासाठी जिद्द देते .😊

तुम्हाला कविता कशी वाटली नक्की कळवा....👍)


2 comments:

  1. अहो...खूप सुंदर आहे ही कविता!
    आवडली मला...मनापासून!
    आज, या तुमच्या लेखणीने जिंगलत आमचं हृदय!

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला आवडल्या बद्दल आणि तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद..
      आपली लेखणी जर कुणाचे मन जिंकत असेल तर असे साहित्य लिहण्यास नक्कीच प्रेरणा मिळते..☺️

      Delete

सागराच पाणी खार का आहे?

माणसामाणसातील वाद ऐकले असतील पण कधी लाट आणि किनाऱ्यातील वाद  ऐकला आहे का? जर वाद होत असतील ना, तर जिंकत नेहमी किनारा असावा. कारण आजन्म ती ला...