हवीहवीशी ती खिडकी....
रोज एक सूर्याची कोवळी किरण डोळयांवर आल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही.तर त्या झोपेतील स्वप्नातून वास्तवी जगात आणते ती म्हणजे खिडकी.फक्त जागवतच नाही तर आपल्या प्रत्येक क्षणात ती आपली सोबती असते.याच खिडकी बद्दल थोडस बोलण्याचा प्रयत्न...
कधी कधी वाटत या खिडकीत बसून पहाव ते निळेभोर आकाश,वाटत थोडस पळाव त्या ढगांच्या वरतून,वाटत मी आपणही उडाव त्या पक्षांच्या थव्यात अन् विसरून जाव जग सार.पण ते वाटण फक्त खिडकीतून पहाव लागत.तिथंच मन मोकळं करावस वाटत.पण खरंच एवढच असत या खिडकीत.??नाही ,तर मग नक्की काय दडलय इथे.???
इथे दडलाय मनाचा मोकळेपणा, सळसळणारा वारा,जीवनाला हवी असते ती शांतता अन् अजून बरंच काही.पुन्हा नवीन पिढीसाठी सांगायच झाल तर दिवसाच 4G net संपवायची जागा असते खिडकी,टिक टॉक व्हिडिओचे परफेक्ट लोकेशन असते खिडकी.instagramचे reel पाहण्याची जागा असते खिडकी.
एवढच काय तर "मेरे सामने वाली खिडकी मे एक चांद का टूकडा "दाखवणारी खिडकी. आजारी पडल्यावर बाहेर पाय टाकता येत नाही पण त्यात सुद्धा आपल्या मित्रांचा बोलबाला कानांपर्यंत पोहचवते ही खिडकी. अजून विचार केला तर सध्याच्या काळात कोरोनाशी लढताना घरात बसून बाहेरच जग दाखवते ती खिडकी....
सकाळच्या वेळी चहा पिण्याची जागा असते खिडकी,कधी एकटयात आठवणीं ताज्या करते ही खिडकी,कधी रडताना धीर देते ती खिडकी तसंच मनमोकळं हसायला शिकवते ती खिडकी. भरकटलेल्या आयुष्यात स्वतःसाठी जगणं शिकवते ती खिडकी. पक्षांचा किलबिलाट कानावर टाकते ती खिडकी. एखादा कवी ,लेखक ,चित्रकार यांना हवी असणारी शांत जागा असते खिडकी जी निर्माण करते नवीन साहित्य,नवीन रूपात,नवीन लेखक,नवीन गायक,नवीन चित्र, नवा चित्रकार अन् बरंच काही....
या खिडकीच नात प्रवासात सुद्धा खुलून येत .कधी विमानात बसून ढगांशी आपली मैत्री जमवते ही खिडकी तर कधी रेल्वेतून पळणारी झाडे दाखवते ही खिडकी.बसमधली विंडोची सीटसुद्धा मिळवायला आपली वेगळीच धडपड असते.कारण ती खिडकी आपल्याला दाखवते संथ वाहणारी नदी जी नैहमी सांगते वाहत जाव झऱ्यासारखं दुसऱ्याच होऊन जगण्यासाठी,वाहत जाव माझासारखं दुसऱ्याला जीवन देण्यासाठी....
उन्हाळयात सळसळणारा थंड गारवा देते ही खिडकी,पावसात हातांवर पडणारा एक एक थेंब वेगळाच अनु्भव देते.टपटप पडणारा तो पाऊस भिजवत नाही पण मनात नेहमी बरसतंच असतो.गुलाबी त्या थंडीमधे प्रेमाला नवीन वळण देते ही खिडकी.मग अस वाटत ही खिडकी आहे की ऋतूंप्रमाणे बदलणारी ,आपल्याला हवी असणारी एक मैत्रीण.
कधी कधी इच्छा असते ,मस्त खिडकीत बसून कानात हेडफोन घालून गाणे एकावे.कधी वाटत रात्री झोप नाही आली तर इथेच येऊन आकाशात पहाव . चांदण मोजाव.त्या चंद्राशी बोलाव.कधी वाटत कुणासोबत वेळ घालवण्यापेक्षा येऊन बसाव या, खिडकीत,रमून जाव आपल्याच जगात,वाटत डोकून पहाव आपल्या मनात ,स्वतःशीच बोलाव थोडस मोकळेपणाने,एकटयातच हसावं मनभरून, वाटेल तसं वावराव...
तर अशी ही खिडकी जी नेहमी आपली साथ देते. आपल्याशी मैत्री करते.कधी खळखळून हसवते,कधी कधी मनमोकळ रडवते,नवीन स्वप्ने दाखवते,आपल्या मनात घर करते अन् नेहमी आपलीच बनून राहते.आपल वेगळंच विश्व निर्माण करते.म्हणूनच
हवीहवीशी ती खिडकी माझा विश्वात रमणारी
हवीहवीशी ती खिडकी माझी होऊन जगणारी
माझी होऊन जगणारी.......
तुम्हाला ही काही आठवत असेलच ना खिडकी जवळ गेल्यावर...तर मग आज मनमोकळ करून बोला थोडंस तुम्हाला आवडणाऱ्या खिडकीबद्दल......👍