Wednesday, April 20, 2022

माझ्या मनाचा स्टोअर रूम

आज काल व्यस्त झालं की फार छान वाटत.ना मनात डोकायची गरज पडत.ना कोणाशी संवाद साधायची.आता आजचं पहा ना . अचानक एकट एकट वाटणं .या पूर्ण जगात जसं मी सोडून कोणीच नाही. शेवटी प्रत्येकाचं मन मोकळं होत असत कुठेतरी, पण मी मात्र कायमच कुलूप लावून ठेवलं आहे. अन् त्याची चावी सुद्धा हरवून दिली. चुकून नाही मुद्दामून .कारण का वेळ द्यावा त्या मनाच्या खोलीत जाण्यासाठी तिथे तर असंख्य जुन्या आठवणी , ते गोड क्षण ,त्या वाईट परिस्थिती आणि अनेक प्रश्नावली धूळ खात पडल्या होत्या.त्यांना साफ तरी कोण करणार.कोणी आहे तरी काय जवळ ? ते साफ करायला नाही ना..!!आणि गेलेच मी साफ करायला तर साफ सफाई पेक्षा जास्त मनाचीच घुसमट होईल त्या जीर्ण गोष्टींमध्ये.

पण काय झाले कुणास ठाऊक.आज ह्या निरव शांततेत दिवस भराच्या धावपळीने ही मला झोप येई ना. शेवटी तरीही त्या मुद्दामून हरवून दिलेल्या चावीला मी शोधून काढलं. अन् मी पुन्हा गेले त्या भूतकाळात जिथे एकेकाळी माझं ही काही वास्तव होत. त्या मनाच्या खोलीत मला खूप काही सापडलं अगदी स्टोअर रूम मध्ये भेटत तसचं काही. पण शेवटी सारच काही जाळ लागून पडलेलं होत. जे काही हाती आल मी सर्वच साफ करत होते.

तिथेच मला माझं बालपण गवसल.हा आता इतक्या दिवस त्या बंद खोलीत राहून थोडंसं धूसर दिसत होत.पण त्या बालपणाचा निरागस भाव अजून ही हृदयाला स्पर्श करत होता.ती शाळा ,ते मित्र मैत्रीण ,ते आईने सांगितलेलं गाणं 
"निंबोळीचा झाडामागे चंद्र झोपला ग बाई " अजून ही कानी गुंजारव करत होत.पण आज कळून चुकल होत की निंबोळीच्या झाडामागे चंद्र कधी झोपतच नव्हता. तो तर रात्रभर जागीच राहायचा. अन् आजीच्या गोष्टीत नेहमी एक आटपाट नगर असायचं.त्या नगरात एक मोठा राजवाडा आणि त्या राजवाड्यात राजा आणि राणी राहायचे. राजा आणि रानीला एक राजकुमार असायचा. त्याला एक राजकुमारी आवडत असायची.इतकंच काय तर शेवटी ते एक ही व्हायचे.पण आजीच्या त्या गोष्टीला खरी स्वीकृती कधी मिळालीच नाही .कारण खऱ्या आयुष्यात  राजकुमार आणि राजकुमारी कधी एक झालेच नाही.त्यांच्यात तर अजून ही जात ,समाज आणि दोघांच्या घरात विरोध असतो.पण तरीही रोज हीच गोष्ट ऐकत आपण आजीच्या मांडीवर एका गाड झोपेत कधी जायचो हे देखील  कळायचं  नाही.

मग मोठ होत जातो. तस तस शाळेत जाणं तिथे रोज खेळणं ,बागडण ,नवीन गोष्टी शिकण,आपल्या मित्र मैत्रिणींसोबत डब्बा खाण, सर्वच मस्त वाटायचं.तरीही ते जग ही मला माझ नाही भासायच. तिथे ही  रोज काहीतरी चुकीचं दिसायचं. म्हणजे पहा ना प्रत्येकाला त्याच्या नुसार नाही तर त्याला मिळणारे गुण किती यावरून त्याची पात्रता ठरवत जात असे.खरचं माणसाचे आचार विचार यांपेक्षा त्याला शिकवण्यात आलेल्या चार गोष्टींवरून त्याला जज तरी का करावं?अजून म्हणायला गेलं तर इतकासा जीव असायचा आणि 4 किलो वजन असलेली बॅग मात्र रोजच खांद्यावर चढायची.वरतून आयुष्यात पंधरा ,सोळा वर्षाचं होई पर्यंत आम्ही हेच ओझ घेऊन चालायचो.पण त्या आयुष्यात ही खूप मौज करण्याची हौस मात्र सर्वांनीच पूर्ण केली असावी.

आता मात्र एक नवीन दुनिया जिथे सारं काही नवीन असायचं. हा आता 15 वर्ष आम्ही जे 4 किलो वजन पाठीवर घेऊन येत राहिलो त्या पेक्षा जास्त अभ्यास इथे असायचा पण तरीही एक वही सोडली तर आमच्या बॅग मध्ये दुसरं काहीच नसायच.मग खरचं त्या छोट्या जीवाला तरी का इतका त्रास असायचा . असो . मग काय रोजची दंगा मस्ती , टपरी वरचा चहा , बस स्टॉप वरची गर्दी अन् शेवटच्या बेंच वरून पहिल्या बेंच वरची जाणारी नजर , तर एक चशमिश टॉपर ला चिडवत राहणं अन् कधी लेक्चर सोडून पळून जाणं, सर्वच काही नित्य नियमच होते. एकेकाळी आपली मुलगी मुलांशी बोलणं न आवडणारे बाबा ही आता खूपच मोकळीक ही देत असे . अन् घरात शांत असणारे सारेच कॉलेज मध्ये वेगळाच attitude मध्ये मिरवत दिसे. पण शेवटी क्षण असाही येतो.जेव्हा सगळेच दूर दूर निघून जातात.एक नवीन प्रवासात स्वतःची ओळख बनवायला सर्वच उडून जात.मात्र त्या गोड आठवणी त्या कॉलेज मध्येच लपून बसतात.

मग आता ही पुढची वर्ष थोडी वेगळीच असतात. जेव्हा घरात सगळे म्हणतात मला मुलगा मुलगी दोन्ही सारखे शेवटी त्याच घरात मुलीचं शिक्षण झालं की कधी तीच लग्न होईल याची खबर सुद्धा नाही लागायची. किंवा ज्यांना वाटायचं आपण आपल्या पायावर उभ राहू.स्वतः जॉब करू ,चांगल्या कामाला लागू , अश्या स्वप्नात जगणाऱ्यांना कधी बाहेर जाऊन दिलं तर ठीक नाहीतर त्यांची स्वप्ने तशीच मोडून जातात . इतकंच काय अचानक एक दिवस आपल्याच कॉलेज मधले एक कपल ने love marriage केलं या पासून तर तो तिला सोडून गेला तर याचा break up झाला अश्या कितीतरी गोष्टी समोर येतात.आणि राहिला प्रश्न टॉपर लोकांचा तर मुलींना आधीच लग्नासाठी जबरदस्ती असते किंवा त्या त्यांची स्वप्न पूर्ण करत असतात आणि मुलांना ही मग चांगले जॉब असतात . आणि मग खरे वळण इथून पुढे चालू होते .

या वळणावर सर्वांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या येऊन पडतात. ते खोडकर वागणारे सर्वच आता matured होऊन वागत असतात.कोणी फॅमिली सांभाळत ,कोणी बिझनेस, कोणी मुल, ,कोणी जॉब ,तर कोणी आई वडील आणि कोणी कोणी तर आज वर आपल्याला कोणतीही उणीव भासू न देणाऱ्या आई वडील यांनाही विचारत नाही.शेवटी त्यांनी केलेल्या प्रेमाची परतफेड ही त्यांना करू वाटत नाही . प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात रमून जात.पण तरीही कोणाची स्वप्न पूर्ण होता कोणाची राहून जातात. अखेर एक दिवस त्याच हातात काठीही येते. अन् आयुष्याच्या त्या शेवटच्या टप्प्यात माणूस जितका वेळ जगतो ते ही फार वेगळच असत. 

कसं ना चार क्षणात माणसाचा जन्म आणि मृत्यू सारंच दोन शब्दात संपून ही गेलं.तरी ही मनात काहूर प्रश्नाचं खरचं आयुष्य इतकं सोपं असतं ? नाही या पेक्षाही काहीतरी वेगळं असतं. फक्त कोणी असं जगत तर कोणी तस जगात.कोणी हसत असत तर कोणी रडत असतं. कोणी सुखात तर कोणी दुःखात.कोणी हास्यमागे अश्रू लपवत तर कोणी अश्रूनांच आपला मित्र बनवत. ह्या भावनेच्या जगात आयुष्य अगदी भरकटत असत. आणि अश्या आयुष्यात जगताना प्रत्येकाला वाटत की हसू असो किंवा अश्रू ,सुख असो किंवा दुःख , या मनाला सावरता यावं ,त्याचा तोल सांभाळता यावा ,आणि या सर्व पैलुंशी एकरूप ,एकनिष्ठ व्हावं. तेवढ्यात अचानक कोणीतरी येऊन मला जवळ घेतलं .मी अचानक घाबरले .पाहिलं तर आई आली होती.मी अजून झोपली नाही म्हणून तिने झोपायला सांगून लाईट बंद करून गेली. अन् लाईट बंद होताच  एवढ्या दिवसांनंतर उघडलेल्या माझ्या मनाच्या खोलीला मी पुन्हा एक कुलूप लावलं. आणि आज ती चावी मी माझ्याच जवळ ठेवली.कोणी मागितली तरी कोणाला ती देयची नाही.कारण त्यातली आठवणींची धूळ आणि भावनांना आलेलं जाळ माझ्याशिवाय कोणाला साफ करता येणारच नाही. कदाचित आज माझी ही आसवे वाहत होती.पण मला सोडून इतर कोणाला ते जाणवलं नाही. अन् ती आसवे गळत असताना मी कधी झोपून गेले कळलेच नाही.फक्त ती आसवे दुःखाची नव्हती तर ती आसवे होती माझ्या मनाला आज कवटाळून भेटलेल्या माझ्या मनाची जी आयुष्य जगायला शिकवत होती. अन् माझ्याशी संवाद साधत होती .आता पुन्हा जेव्हा हे कुलूप पुन्हा उघडेल तेव्हा पुन्हा एकदा या मनाच्या स्टोअर रूम मध्ये नक्की या माझ्यासोबत.

(माझ्या मनाचा स्टोअर रूम ...कसा आहे नक्की कळवा.😊)

सागराच पाणी खार का आहे?

माणसामाणसातील वाद ऐकले असतील पण कधी लाट आणि किनाऱ्यातील वाद  ऐकला आहे का? जर वाद होत असतील ना, तर जिंकत नेहमी किनारा असावा. कारण आजन्म ती ला...