महिला दिवस कधी साजरा करावा..???
ती असो / मी असो किंवा कोणतीही स्त्री असो ही अशीच असते.प्रत्येक गोष्टीत ती सक्षम,धीट,स्थिर आणि चंचल असते.प्रसंगी ती लढू शकते,मन मारून जगू ही शकते आणि स्वप्न स्वतःची पूर्ण करण्यासाठी जिद्दिही ती बनू शकते..
मोकळ्या आभाळी उडू शकते ,खूप काही सहन करूनही खूप काही साकार करू शकते..
पण हे एवढं लिहून तर कोणीही म्हणेल ," जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"...
पण खरचं एवढं लिहून होतो का हा दिन साजरा..?
प्रश्न वाचून नक्कीच गोंधळात पडले असतील काही जण.की जर 8 मार्च हा अगोदरच जागतिक महिला दिवस म्हणून साजरी केला जातो तर " महिला दिवस केव्हा साजरी करावा ?" हा प्रश्न मी का विचारतेय.कारण मला अस वाटत की जर महिलांना त्यांच्या आयुष्यात त्यांना हवं ते करता येत नसेल ,त्यांची स्वप्न पूर्ण करता येत नसतील,त्यांना हीन वागणूक दिली जात असेल , भ्रूणहत्या, लेंगिक शोषण ,acidic हल्ला ,छेडछाड ,शिक्षण वंचित ,बलात्कार या गोष्टींना समोर जाव लागत असेल तर मग हा महिला दिवस साजरी करून काय उपयोग..???
कारण इथे प्रत्येकाला जगण्याचं काही करून दाखवण्याचं स्वातंत्र्य आहे .मग मुलींना,स्त्रियांना का नाही...????
तुम्ही म्हणाल की आम्ही तर प्रसंगी त्यांचे कौतुक करतो,त्यांना मान देतो, कोणावर बलात्कार झाला तर मेणबत्ती लावून फिरतो,भ्रूणहत्या झाली की मोठ मोठ नारे लावतो,कोणी देशाचा गौरव वाढवला तर रोज त्या गोष्टीची विचारणा करतो.
पण मग त्यावेळी हे जग कुठे असत जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात.खरचं सांगा ना की फक्त सर्व प्रकार घडून गेल्यावरच लोकांना,समाजाला आणि सरकारला जाग येत असते.विषय फार गंभीर तेने मांडते आहे अस नाही पण जर इथे मी सुरक्षित आहे अस म्हणण्याची खात्रीच मुलींना नाही तर मग खरचं हा दिवस साजरा करण्यात काही तथ्य आहे का..??
मला तरी नाही वाटत..
कारण फक्त एक दिवस स्त्रियांची थोरवी सांगून तर महिला दिवस नाही साजरा होऊ शकत ना..!!!
उलट
जेव्हा या जगात एकही "निर्भया" जन्म घेणार नाही...
एकही "प्रियांका" जळणार नाही...
पाच वर्षाच्या "नंदिनी" प्रमाणे बलात्कार ने आपला जीव गमवणार नाही...
जेव्हा छपक सारखी " लक्ष्मी अग्रवाल " एका सिनेमात दाखवण्याची गरज पडणार नाही...
जन्म घेण्या आधीच आईच्या गर्भात एखाद्या मुलीची भ्रूणहत्या थांबणार नाही...
प्रत्येक मुलीला शिक्षण घेण्यासाठी रोखले जाणार नाही...
जेव्हा या जगात good touch and bad touch काय असत.हे मुलींना शिकवण्याची गरज पडणार नाही..
मासिक पाळीचा वेळी त्यांना हीन वागणूक मिळणार नाही,
की इथेच उठाव तिथेच बसावं हेच करावं, मंदिरात नाही जाव...
जेव्हा रस्त्याने चालताना कोणाची भर रस्त्यात छेड काढली जाणार नाही..
जेव्हा अकारण लादले जाणारे बंधन मोडणार नाही...
जेव्हा स्वतःच अस्तित्व बनवायला त्यांना रोखले जाणार नाही...
जेव्हा त्यांचा स्वाभिमान ,इज्जत ,प्रतिष्ठा या एकही गोष्टीला ठेच लागणार नाही...
जेव्हा साधं पाच मिनिटे घरी यायला उशीर झाला तरी तिला थबकावे लागणार नाही
अन् बाहेर पडताना तिला हातात paper spray घेऊन हिंडण्याची गरज पडणार नाही
आणि जेव्हा एका मुलीलाच पाऊल घेऊन माझ्यासारखं स्त्रियांसाठी या गोष्टी तिच्या लेखांमधून मांडण्याची गरज पडणार नाही
तोपर्यंत तरी जागतिक महिला दिवस हा नावापुरताच आहे अस वाटत.
कारण एक दिवस महिलांना पुजायच आणि नंतर त्यांनाच नको नको त्या गोष्टीत अडकवून ठेवायचं यालाच तुम्ही महिलांचा गौरव मानत असाल तर हा 8 मार्च फक्त कॅलेंडर मध्ये पहावा एक वर्षाची तारीख म्हणून
अन् तरच हा महिला दिवस साजरी करावा उद्या पुन्हा त्यांना दुय्यम स्थान देणार म्हणून
हो माहिती आहे की या जगात स्थान आहे मुलींना
कौतुक सुद्धा होत त्यांचा लढा पाहून
आणि विरतेची गोष्ट ही सांगण्यात येते तिची सर्वांना
पण अजून हि भरपूर गोष्टी आहे ज्या त्या सहन करतात.
अजून ही भरपूर बंधनात त्यांना अकारण अडकवले जाते.
अनेक गोष्टींसाठी त्यांना लढावे लागते.
म्हणून जर या गोष्टी आपण बदलू शकत असू तरच तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🙏
तुम्हाला काय वाटतं जे लीहल ते योग्य आहे का...???
कारण आपण लिहितो ती गोष्ट प्रत्येकाला पटेलच असे नाही.पण खरचं महिला दिवस कधी साजरा करावा..???या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का...???
कॉमेंट मध्ये नक्की कळवा..👍🙏🙏